Certificate Course in Communicative Marathi for Non Marathi speakers

Menu

Certificate Course in Communicative Marathi for Non Marathi speakers

मराठी ही भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे आणि ती महाराष्ट्र राज्याची लोकभाषा तसेच राजभाषाही आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची कवाडे उघडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आपले महाराष्ट्रातील वास्तव्य अधिक वास्तवाभिमुख आणि अधिक आनंददायक करण्यासाठी ह्या भाषेच्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. पहिली भाषा शिकण्याच्या तुलनेत एखादा भाषा दुसरी वा परभाषा म्हणून शिकणे वेगळ्या तऱ्हेचे असते.

अन्यभाषकांच्या (म्हणजेच मराठी ही ज्यांची पहिली भाषा नाही अशांच्या) आवश्यकता लक्षात घेत मराठी बोलण्यावर भर देऊन मराठी भाषेचे प्राथमिक ज्ञान अन्य भाषकांना प्राप्त व्हावे हे ह्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे, तिच्या लिपीचे, उच्चारवैशिष्ट्यांचे, व्याकरणाचे तसेच सांस्कृतिक घटकांचे प्राथमिक ज्ञान सुलभपणे देणे हे ह्या अभ्यासक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ह्या अभ्यासक्रमात वाचन, श्रवण, संभाषण आणि लेखन ह्या चारही भाषिक कौशल्यांसंबंधीच्या विविधांगी सरावसामग्रीचा समावेश असणार आहे. भाषेच्या संरचनांच्या सरावाबरोबरच त्यांच्या प्रसंगोचित उपयोजनाकडेही ह्या अभ्यासक्रमात लक्ष पुरवण्यात येणार आहे.

Language : English |  Marathi

मुख्य माहिती

कालावधी
4 MONTHS
कार्यक्रम कोड
ST7913
अभ्यासाचा प्रकार
ONLINE
कॅम्पस
विद्याविहार - मुंबई
संस्था
K J Somaiya School of Languages and Literature

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

  • प्राथमिक संवादात्मक कौशल्य: दैनंदिन व्यवहारात आत्मविश्वासाने संवाद साधता येण्यासाठी आवश्यक कौशल्यांची पायाभरणी.

  • पायाभूत व्याकरण आणि शब्दसंग्रह: महत्त्वाच्या व्याकरणिक संरचनांचे शिक्षण आणि प्रभावी अभिव्यक्तीसाठी तुमच्या शब्दसंग्रहाचा विस्तार.

  • श्रवणकौशल्ये आणि आकलनकौशल्ये: बोलचालीतल्या मराठीच्या आकलनक्षमतेचा प्रात्यक्षिक सरावांद्वारे विकास.

  • वाचनकौशल्ये आणि अर्थांकनकौशल्ये: सोप्या पाठांच्या वाचनाचा सराव आणि त्याद्वारे आकलनक्षमतांची वाढ.

  • भाषण आणि उच्चार : अचूक उच्चारणावर भर आणि संवादात्मक सत्रांद्वारे ओघवते भाषण.

  • मराठी लेखन: मराठीत प्राथमिक वाक्ये, संदेश आणि सुस्पष्ट परिच्छेद लिहिण्याचे शिक्षण.

  • सांस्कृतिक जाणीव आणि संवेदनशीलता: मराठी परंपरा, प्रथा आणि सामाजिक संकेत ह्यांविषयीची मर्मदृष्टी.

  • दैनंदिन जीवन-प्रसंगांतील उपयोजन: खरेदी, परिचय आणि संवाद ह्यांसारख्या वास्तवाभिमुख प्रसंगांत आपल्या भाषिक कौशल्यांचे उपयोजन.

अभ्यासक्रमाचे वेगळेपण

  • सर्वांगीण अभ्यासक्रम: सर्वांगीण शिक्षणाची खात्री मिळावी ह्यासाठी वाचन, लेखन, श्रवण आणि भाषण चारही मूलभूत भाषिक कौशल्यांचा समतोल साधण्यावर भर.

  • प्रशिक्षित अध्यापकवर्ग:नवशिक्या विद्यार्थ्यांना प्रभावी आणि रंजक पद्धती वापरून मार्गदर्शन करण्यास कटिबद्ध असलेल्या प्रमाणित, अनुभवी शिक्षकांद्वारे अध्यापन.

  • अभिरूप परीक्षा (मॉक एक्झाम) आणि सराव-चाचणी: नियमित मूल्यमापन आणि सराव-चाचण्यांद्वारे विद्यार्थ्यांत आत्मविश्वासाची रुजवण आणि अंतिम मूल्यमापनासाठी त्यांची परिपूर्ण पूर्वसिद्धता.

  • सार्वत्रिक मान्यता असलेले प्रमाणपत्र: विद्यार्थ्यांच्या गुणदर्शनात (प्रोफाइल) मोलाच्या विद्याशाखीय श्रेयांकांची भर घालणारे, विद्यापीठाची अधिकृत प्रमाणपत्र.

नियोजित व्याख्याने

  • शनिवार-रविवार

अभ्यासक्रम

पातळी १ - ६० तास/ ४ महिने

मराठी भाषा आणि लिपी ह्यांचा प्राथमिक परिचय, प्राथमिक शब्दसंग्रह आणि वाक्यरचना, दैनंदिन वापरासाठी उपयोजनलक्ष्यी मराठी, श्रवणाचे आणि भाषणाचे सराव.

पातळी २ - ६० तास/ ४ महिने

छोट्या मजकुराद्वारे वाचनाचा आणि लेखनाचा सराव, दैनंदिन जीवनातील प्रसंगानकूल प्राथमिक संवाद, सांस्कृतिक संदर्भ आणि संवादातील शिष्टाचार.

अभ्यासक्रम-समन्वयक

श्रीमती. भूमी मालदे

साहाय्यक प्राध्यापक - फ्रेंच भाषा

bhumi@somaiya.edu

Apply Now Enquire Now Chat with a Student